आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:विद्युतपंपांसाठी दिवसा वीज द्या

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतात पिकांना पाणी देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून दोन सत्रांत वीज दिली जाते. रात्रीच्या वेळी वीज दिल्याने अनेक शेतकऱ्यांना आरोग्याच्या समस्या जाणतात. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे. पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी, डाऊच खुर्द, घारी, देर्डे, चांदवड, कोराळे, आदी भागातील शेतकऱ्यांनी सध्या आपल्या शेतामध्ये रब्बीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. महावितरण कंपनीकडून रात्रीची वीज मिळते.

हा शेतकऱ्यावर अन्याय असून इतर सर्वच क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिवसा नोकरीची वेळ असते. शेतकरी अनिल चव्हाण म्हणाले, अनेक परिसरात बिबट्या, लांडगे, तरस, रानडुक्कर, हे हिंस्त्र प्राणी दहशत निर्माण करत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीविरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे अनिल चव्हाण यांनी सांगितले. सध्या गहू व कांद्याची लागवड चालू असल्याने शेतकऱ्यांना कोणताच विचार न करता आपल्या शेतात या पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालतात.

बातम्या आणखी आहेत...