आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:नागरिकांना निश्चित केलेल्या वेळेत सेवा द्या‎

नगर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेला पारदर्शक, गतीमान सेवा‎ देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क‎ कायद्याची स्थापना करण्यात आली‎ आहे. या अंतर्गत कायदा व नियमांचा‎ सखोल अभ्यास करून सर्वसामान्य‎ नागरिकांना निश्चित केलेल्या वेळेत‎ सेवा द्याव्यात असे आवाहन राज्य‎ सेवा हक्क आयोगाचे उपसचिव‎ सुनील जोशी यांनी बुधवारी (८‎ मार्च) ला केले.‎ पारनेर तहसील कार्यालयात प्रमुख‎ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत‎ जोशी बोलत होते. तहसीलदार‎ शिवकुमार अवळकंठे, गट विकास‎ अधिकारी किशोर माने, आयोगाचे‎ पी. बी. घोडके उपस्थित होते. जोशी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्हणाले की, सर्वसामान्यांना‎ ऑनलाईन पद्धतीने सेवा‎ देण्याच्यादृष्टीने अनेक शासकीय‎ विभागांना अधिसूचित करण्यात‎ आले आहे. या सेवा देत असताना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ किरकोळ त्रुट्यांमुळे नागरिकांना सेवा‎ मिळत नसल्याने नागरिक‎ आयोगाकडे अपील करतात. सामान्य‎ नागरिकांनी मागितलेल्या सेवा‎ नाकारताना तांत्रिक व प्रशासकीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बाबींची पूर्तता होत नसेल तरच सेवा‎ नाकाराव्यात.

किरकोळ त्रुटींची‎ जागेवरच पूर्तता करुन अधिकाधिक‎ नागरिकांना सेवा देण्याच्या सुचनाही‎ जोशी यांनी यावेळी केल्या.‎ नागरिकांना सेवा देत असताना‎ अवाजवी कागदपत्रांची मागणी‎ करण्यात येऊ नये. आवश्यक‎ कागदपत्रांचीच मागणी करण्यात‎ यावी. सेवा देत असताना‎ नागरिकांची कुठल्याही प्रकारची‎ अडचण होणार नाही, याची दक्षता‎ घेण्याच्या सुचना करत प्रथम व‎ द्वितीय अपिलीय अधिकाऱ्यांनी‎ नामंजूर अर्जांचा नियमित आढावा‎ घ्यावा. प्राप्त अर्जांची नोंदवही‎ ठेवावी. अर्जाच्या प्रलंबिततेच्या‎ तपासणीसाठी दैनंदिन डॅशबोर्डची‎ तपासणी करावी. नागरिकांनी सेवा‎ मिळण्यासाठी ऑफलाईन अर्ज‎ केले असतील तर ते ऑनलाईन‎ करुन घेण्याच्या सुचनाही त्यांनी‎ यावेळी केल्या.‎

कार्यालयांना भेट‎
सामान्यांना सेवा देणाऱ्या आपले‎ सरकार सेवा केंद्राला जोशी यांनी‎ प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची‎ पहाणी केली. या सेवा केंद्रातून‎ नागरिकांना सेवा कशा पद्धतीने‎ पुरवल्या जातात, सेवेपोटी योग्य‎ शुल्क आकारण्यात येते काय‎ याबाबत पहाणी करुन केंद्र‎ चालकांच्या अडी-अडचणीही त्यांनी‎ यावेळी समजुन घेतल्या.‎

बातम्या आणखी आहेत...