आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आपलं गाव'चा अनोखा उपक्रम:आदिवासी विद्यार्थिनीला शिक्षणासाठी केली आर्थिक मदत; फाऊंडेशनने घेतली पुढील शिक्षणाची जबाबदारी

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी गरीब व गरजू मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आपलं गाव फाऊंडेशनने नगर येथील पारनेर तालुक्यातील एका आदिवासी कुटुंबातील काजल दिगंबर चिकणे या मुलीला पुढील शिक्षणासाठी 11 हजारांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली आहे.

काजल ही बारावी उत्तीर्ण आहे. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या फाऊंडेशन सामाजिक संस्थचे अध्यक्ष डॉ. सुरेश खणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

कुटुंबियांची घेतली भेट...

याबाबत फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.खणकर यांची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे. आपण बऱ्याच वेळा म्हणतो सावित्रीच्या लेकी शिकल्या पाहिजेत. परंतु हा संदेश त्यांच्यापर्यंत किती पोहचतो हा प्रश्न आहे.कारण बाभुळवाडे गावातील आदिवासी कुटुंबातील मुलगी काजल जिला बारावी विज्ञान शाखेत 64 % गूण मिळवून ही घरी बसावे लागले होते. एक वर्ष तिचे शिक्षण थांबले होते. जेव्हा आपल गाव फाउंडेशनला ही गोष्ट समजली तेव्हा तिला व तिच्या वडिलांची भेट घेतली, तिला पुढील शिक्षण घ्यावे असा आग्रह केला .त्यांनी पैसा अभावी पुढील शिक्षण घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यावेळेस फाउंडेशनने तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे ठरवले.

काजलचा आनंद गगनात मावेना...

काजलला पारनेर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे प्रवेश घेऊन देण्यात आला. तसेच शासकीय वसतिगृहात देखील प्रवेश निश्चित केला. त्यामुळे काजल फारच खुश झाली. तसेच वह्या, पुस्तके व इतर खर्चासाठी 11,000/- चेक नुकताच आपल गाव फाउंडेशनच्या कार्यालयात देण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ सुरेश खणकर , माजी सरपंच बी आर जगदाळे, संतोष बोरुडे सर, साहेबराव चौधरी सर, गणेश कदम, जब्बार पठाण, सागर गुंड काजलचे वडील दिगंबर चिकणे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

गावाकडील माणसाचा विकास आवश्यक

बाभुळवाडे येथील आपलं गाव फाऊंडेशन माध्यमातून अनेक गोरगरीब गरजू घटकांना मदत देण्याचे काम सातत्याने होत आहे. बाभुळवाडा येथील ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने मुंबई पुणे व राज्यातील इतर भागांत नोकरी, व्यवसाय निमित्ताने स्थायीक झाले आहेत. बहुतांश लोक राज्य व केंद्र सरकारच्या सेवेत उच्च पदस्थ अधिकारी आहेत. व्यवसायात सुद्धा अग्रगण्य आहेत. मात्र गावाकडील माणासाचा विकास झाला पाहिजे या भावनेतून गावकरी, अधिकारी व व्यवसायिक यांनी आपलं गाव फाऊंडेशन ही सामाजिक संस्था कार्यरत केली आहे. गेली अनेक वर्षांपासून या संस्थेचे सामाजिक काम नगर, पुणे व मुंबई शहरात नावलौकिकास पात्र ठरले असून अशा संस्था गाव व परिसरातील गरीब गरजू घटकांना सातत्याने मदत करीत असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...