आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहरमच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. सोमवारी रात्री ‘कत्तलकी रात’ आणि मंगळवारी मिरवणुकीसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. राज्य राखीव दलाच्या एक कंपनीसह ५७ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त राहील, अशी माहिती विशेष शाखेचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी दिली.‘कत्तल की रात’ आणि मोहरम विसर्जन मिरवणुकीसाठी शहर आणि परिसरातील भाविकांची संख्या मोठी असते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पाच पोलिस उपअधीक्षक, १८ पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाचे ३२ अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ४९३ पोलिस अंमलदार, १३६ महिला पोलिस अंमलदार तैनात राहतील. आरसीपीची तीन पथके, एसटीआरची आठ पथके आणि धडक कृती दलाचे एक पथक राहील. मिरवणूक मार्गाचे चित्रीकरणही केले जाणार आहे.
८११ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई
कायदा आणि शांतता आबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि शांतता धोक्यात आणण्याची शक्यता असलेल्या ८११ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०८ खाली २८८, कलम ११० अन्वये ६७, कलम १४१ अन्वये २९६, कलम १४४ अन्वये १२५, तसेच दारू विकणाऱ्या ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना मोहरम काळात शहराबाहेर रहावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.