आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:बालविवाहाबाबत श्रीगोंदे तालुक्यात जनजागृती

श्रीगोंदे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाइल्ड लाइन से दोस्ती सप्ताहाच्या सातव्या दिवशी अहमदनगर चाइल्ड लाइन टीम यांनी तालुक्यात बालविवाहाबाबत जनजागृती केली. या टीमने वाडी, वस्ती, पालांवर भटक्या विमुक्त जातीजमातींच्या नागरिकांना आणि महामानव बाबा आमटे बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था येथे जाऊन चाईल्ड लाईन १०९८ या हेल्पलाइनची माहिती दिली तसेच, बालविवाह आणि बाल लैंगिक अत्याचार संदर्भात जनजागृती करण्यात आली.

तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांना चाईल्ड लाईन बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मुलांना काही प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला चाईल्ड लाईन बद्दल माहिती आहे का? चाइल्डलाइन चा टोल फ्री क्रमांक काय? चाइल्ड लाइन कोणत्या घटकासाठी काम करते? असे प्रश्न विचारण्यात आले आणि तीनही प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना छोटी-मोठी बक्षीस देण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महेश सूर्यवंशी, अलीम पठाण, शाहिद शेख, मंजूषा गावडे, अब्दुल खान, अनुजा मुळे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...