आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य निवडणूक आयोगाच्या आवाहनाला अनुसरून नवमतदारांना प्रोत्साहित करणेसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शाळेवर विद्यार्थ्यांचा समावेश असलेला मतदार जागृती मंच स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात मतदार जागृती करण्याचे मोठे काम केले जात आहे. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शाळा व महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात येतात.
यावेळी प्रथमच मतदार दिननिमित्त मतदार जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमलता वाकडे, स्वीप समन्वयक शकील बागवान आणि संदीप पाळंदे यांनी तालुक्यातील प्रत्येक शाळा व वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या.
बेलापूरच्या जेटीएस महाविद्यालयात प्राचार्य श्रीराम कुंभार, उपप्राचार्या सुनीता ग्रोव्हर यांच्या सहकार्याने तसेच नोडल अधिकारी राहुल जेजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचची प्रमुख प्राजक्ता नरवडे, श्रावणी काळे, भक्ती बर्गे, पल्लवी गायकवाड, ज्ञानेश्वरी आंबेकर, इशिता सोनवणे, ओमकार टाकसाळ, अनिकेत काळे, किरण म्हस्के व यशवंत भोर आदींनी बेलापूर रोडवरील शेतीची औजारे बनवणारे तसेच उघड्यावर पाल टाकून वास्तव्य करणाऱ्या तसेच रहिवास पुराव्याअभावी मतदार नोंदणीसाठी संघर्ष कराव्या लागलेल्या घिसाडी समाजातील मतदारांशी संवाद साधला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.