आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:जन शिक्षणने महिलांना आत्मनिर्भर‎ करुन रोजगाराचा मार्ग दाखवला : शेख‎

नगर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला व युवतींमध्ये रोजगार‎ कौशल्य निर्माण करण्याचे काम जन‎ शिक्षण संस्थेने केले. महिलांना‎ आत्मनिर्भर करुन रोजगाराचा मार्ग‎ दाखविण्याचे कार्य अविरतपणे संस्था‎ करत आहे. अनेक महिलांनी‎ स्वत:च्या पायावर उभे राहून‎ कुटुंबाची प्रगती साधली. महिलांनी‎ स्वतःचे कौशल्याची आवड‎ ओळखून त्या क्षेत्राचे व्यावसायिक‎ प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्याचे‎ आवाहन स्नेहालयाचे सहसंचालक‎ हनिफ शेख यांनी केले.‎

भारत सरकारच्या कौशल्य‎ विकास व उद्योजकता मंत्रालय‎ (नवी दिल्ली) संचलित शहरातील‎ जनशिक्षण संस्थेच्या अठराव्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वर्धापन दिनानिमित्त महिला व‎ युवतींसाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण व‎ रोजगाच्या संधी या विषयावर‎ आयोजित व्याख्यानात शेख बोलत‎ होते. यावेळी व्यवस्थापकीय‎ कमिटीचे व्हा. चेअरपर्सन मनीषा‎ शिंदे, सदस्य पूजा देशमुख,‎ बाळासाहेब पवार, कमल पवार,‎ शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, माधुरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घाटविसावे, अनिल तांदळे, उषा देठे,‎ विजय बर्वे उपस्थित हाेते.‎ शेख म्हणाले, सर्वांच्या जीवनात‎ समस्या असतात, त्या समस्यांपुढे न‎ डगमगता मार्ग काढून स्वतःचे‎ अस्तित्व निर्माण करावे लागते. मोठी‎ स्वप्न पाहून, ते साकार करण्यासाठी‎ प्रयत्नशील राहिल्यास यश निश्‍चित‎ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...