आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन साजरा:आजी माजी शिक्षकांच्या सत्कारासह प्रवरेचे पाणी पुस्तकाचे प्रकाशन

अकोले23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मेहेंदुरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात गणेशोत्सव व शिक्षक दिनानिमित्त आजी माजी शिक्षकांच्या सत्कारासह जादूगार पी. बी. हांडे फाउंडशनच्या माध्यमातून इयत्ता १० वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारास अकोल्यातील जुन्या पिढीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. शिवाजीराव बंगाळ यांच्या हस्ते ‘प्रवरेचे पाणी’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध उपक्रमांनी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. शिवाजीराव बंगाळ, सुधाकर आरोटे, एस. पी. देशमुख, जादूगार पी. बी. हांडे यांनी मनोगत व्यक्त केली.

स्वागत बाबाजी पापळ यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता बंगाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पथवे व एम. एस. शेटे यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक शंकरराव बंगाळ, रामराव बंगाळ, शरद देशमुख, कवयित्री मंदाकिनी हांडे, डॉ. सचिन चासकर, विकास बंगाळ, निवृत्त प्राचार्य दत्तात्रय चासकर, चंदनेश्वर विद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा चासकर, प्रा. एस. टी. चासकर, प्राचार्य शांताराम बंगाळ, उत्तम साबळे, निवृत्त मुख्याध्यापक बी. के. बनकर, के. एम. वाकचौरे, डी. एन. काळे, सदानंद बंगाळ, मुख्याध्यापक भानुदास बंगाळ, निवृत्त मुख्याध्यापक एम. डी. बंगाळ, भाऊसाहेब मंडलिक, विकास हासे, रामदास आरोटे, सुदाम आरोटे उपस्थित होते. आभार लक्ष्मण राऊत यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...