आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी अॅनालिसीस:अधिकृत दरनिश्चितीमुळे पीयूसी प्रमाणपत्र केंद्रचालकांच्या मनमानीला बसणार चाप; चाचणी केंद्रावर सुधारित दरपत्रक लावण्याचे निर्देश

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाहनांच्या वायुप्रदूषण चाचणीसाठी महाराष्ट्र शासनाने अधिकृत दर निश्चित केले आहेत. यापूर्वी पीयूसी तपासाी केंद्रचालक मनमानी पद्धतीने दरआकारणी करत होते. आता नवे दरफलक प्रत्येक केंद्रावर लावणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे पीयूसी तपासणी केंद्राचालकांच्या मनमानीला चाप लागणार आहे.

महाराष्ट्र शासनाने २५ एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशानुसार पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये सुधारणा करुन दरवाढीस मंजुरी दिली आहे. आता वाहनांची वायुप्रदुषण चाचणी करुन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र जारी करण्यासाठी नवे दर निश्चित केले आहेत. यापूर्वी या प्रमाणपत्रासाठी वाहनधारकांना केंद्रचालक सांगतील ती रक्कम मोजावी लागत होती. कारण अचानकपणे वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी झाली तर पीयुयी प्रमाणपत्र नसल्यास हजार रुपयांचा दंड भरावा लागत हाेता. त्यामुळे वाहनधारक केंद्रचालक सांगतील ती रक्कम भरून प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करायचे.

मनमानी थांबणार
यापूर्वी केंद्रचालक ऑनलाइन प्रदूषण नियंत्रण चाचणी प्रमाणपत्र द्यायचे. पण, त्यासाठी किती दर आकारायचे, यावर नियंत्रण नव्हते. त्यामुळे याबाबत तक्रार करता येत नव्हती. आता सुधारित दर निश्चित झाल्यामुळे वाद टळतील. ''
साईनाथ भोसले, वाहनचालक.

बातम्या आणखी आहेत...