आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:जलसंपदा विभागात पुणे विरुद्ध अहमदनगर संघर्ष, मविआचे पुण्यातील 65 बंधारे मंजुरी प्रकरण

जितेंद्र निकम | नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जलसंपदा िवभागात नाशिक विरुद्ध मराठवाडा असा वाद कायम असतो. त्यात पुणे विरुद्ध अहमदनगर अशा वादाची भर पडली आहे. त्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्याच्या बाजूने ठोस भूमिका घ्यावी, असे प्रयत्न होत आहेत.

नगरकरांच्या मते जलसंपदा खात्यावर पुणेकरांची कायम मक्तेदारी राहिली आहे. त्यामुळेच आजमितीला कुकडी प्रकल्पात ४.९५ टीएमसी पाणी उपलब्ध असतानाही वेळोवेळी विधानसभेत जलसंपदा खात्याने पाणी शिल्लक नसल्याची चुकीची माहिती देत सभागृहाची कायम फसवणूक केली. म्हणूनच नगर जिल्ह्यातील साकळाईसारखी योजना २५ वर्षांपासून रखडली आहे. पुण्याची मक्तेदारी विखे यांनी मोडून काढावी, अशी मागणी नगर, श्रीगोंदे तालुक्यातून होत आहे.

कुकडी प्रकल्पात ४.९६ टीएमसी पाणी शिल्लक असून त्या आधारे पुणे जिल्ह्यातील ६५ बंधाऱ्यांना २.५५ टीएमसी पाणी देता येईल, अशी शिफारसही २६ जून रोजी महाविकास आघाडी सरकारला करण्यात आली. तेव्हा शिंदे गटाचे बंड निर्णायक टप्प्यात आले होते. म्हणून ती शिफारस तातडीने मान्य करून ६५ बंधाऱ्यांना एकतर्फी मान्यता देण्यात आली. त्या बद्दल दोन्ही तालुक्यात होणाऱ्या सर्वस्तरीय शेतकरी बैठका, मेळाव्यांमध्ये तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...