आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा कुलकर्णी यांचा इशारा:लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सरकारी सेवा देण्यास विलंब केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

अहमदनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत एखाद्या अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सरकारी सेवांचा लाभ देण्याचे टाळल्याचे दिसून आल्यास त्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी शुक्रवार (17 जून) ला दिला आहे.

लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मुदतीत व ऑनलाइन मिळाला पाहिजे. यासाठी "आपले सरकार' पोर्टल तयार करण्यात आले आहे.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कुलकर्णी बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाल्या, लोकसेवा हक्क आयोग कायदा 2015 मध्ये लागू झाला आहे. शासनाचे विविध विभाग, महामंडळे ज्यांना शासनाचे संपूर्ण शंभर टक्के अनुदान आहे. अशा सर्व संस्थांसाठी हा कायदा लागू होतो. विविध विभाग महामंडळांतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा मुदतीत व ऑनलाइन मिळाव्यात हा मुख्य हेतू या आयोगाचा आहे.

विविध सेवांसाठी "आपले सरकार 'हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यात ई -सेवा केंद्र, महा ई -सेवा केंद्र यातून अल्प दरात या सेवा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. लोकांचा वेळ वाचावा यासाठीच या केंद्रामार्फत या सेवा पुरवल्या जातात. राज्य लोकसेवा हक्क आयोगाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, विविध सरकारी सेवांचा लाभ देण्यास एखाद्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्यास त्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

राज्यपालांच्या सूचना

गेल्या डिसेंबर महिन्यात राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या राज्यातील पाच विभागात विभागीय आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय होते. ते निवृत्त झाल्याने सध्या हे पद रिक्त आहे. विभागीय आयुक्तांचे पद हे संवैधानिक असून, राज्यपालांनी या नियुक्त्या केलेल्या आहेत, असे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...