आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Puntamba Farmer Protest Postponed For 2 Days, Will There Be A Meeting In The Ministry On 7th June Under The Chairmanship Of Deputy Chief Minister Ajit Pawar

पुणतांबा धरणे आंदोलन 2 द‍िवस स्थग‍ित:अज‍ित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 7 जूनला मंत्रालयात बैठक, तोडगा निघणार का?

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणतांबा येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन दोन दिवस स्थगित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 7 जून रोजी मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीत या आंदोलनावर तोडगा निघणार का, याची उत्सुकता लागली आहे.

कृषीमंत्र्यांनी घेतली भेट

राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या व‍िव‍िध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी शनिवारी भेट घेतली. क‍िसान क्रांतीच्या कोअर कम‍िटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर 15 मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सव‍िस्तर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

मागण्यांबाबत सरकार सकारात्मक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून शेतकऱ्यांच्या ह‍िताचे न‍िर्णय घेण्यात येतील, अशा शब्दात कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना यावेळी आश्वस्त केले. पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी व‍िव‍िध मागण्यांसाठी 1 जूनपासून धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे. शनिवारी आंदोलनाचा 4 था द‍िवस होता. कृषीमंत्र्यांशी शेतकऱ्यांच्या झालेल्या चर्चेनंतर क‍िसान क्रांतीच्या कोअर कम‍िटीने पुणतांबा येथील धरणे आंदोलन 2 द‍िवसासाठी स्थग‍ित केले असल्याचे यावेळी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...