आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याची अंमलबजावणी त्वरित सुरु करण्याची मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.

याप्रसंगी श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर स्मारक संवर्धन समितीचे महासचिव भगवानराव जऱ्हाड, धनगर महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब तागड, धनगर समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र तागड, अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष अशोकराव होनमाने, ए. वाय. नरोटे, गणेश शिंदे, शिवाजी नवले आदी उपस्थित होते. या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनास आपल्या कार्यालयाकडून आवश्यक त्या बाबींची त्वरित पूर्तता करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...