आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Purchase Of 26 Thousand 623 Quintals Of Gram With Guarantee In Ahmednagar District; Procurement Under NAFED By District Marketing Federation Till June 18 |marathi News

कृषी:अहमदनगर जिल्ह्यात हमीभावाने 26 हजार 623 क्विंटल हरभरा खरेदी; जिल्हा पणन महासंघाच्या वतीने नाफेड अंतर्गत 18 जूनपर्यंत खरेदी होणार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​जिल्हा पणन महासंघाच्या वतीने नाफेड अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील आठ खरेदी केंद्रावर हमीभावाने हरभरा खरेदी सुरू आहे. नगर जिल्ह्यात रब्बी हंगामात ८४ हजार हेक्‍टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली होती. या वर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चालू हंगामात २६ हजार ६२३ क्विंटल हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यात आली. पणन महासंघाच्या खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला चांगला भाव मिळत आहे.

जिल्हा पणन महासंघाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल ५ हजार २३० रुपये या हमीभावाने हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. हरभरा खरेदीसाठी पणन महासंघाकडून जिल्ह्यात ८ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या आठ खरेदी केंद्रावर सध्या शेतकऱ्यांकडून नाफेड अंतर्गत हमीभावाने हरभरा खरेदी सुरू आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यात ११ हजार ३५ क्विंटल ९६ किलो, कर्जत येथील खरेदी केंद्रावर ४ हजार ३६६ क्विंटल ३० किलो, अहमदनगर येथील केंद्रावर २१४९.६० क्विंटल, पारनेरमध्ये ३३४ क्विंटल, पाथर्डीत ६ हजार ३६१ क्विंटल, राहुरीत ९७५ क्विंटल, श्रीगोंदे १२३६.५० क्विंटल, कोपरगावमध्ये १६६ क्विंटल असे एकूण २६ हजार ६२४.३६ क्विंटल जिल्ह्यात हरभरा खरेदी करण्यात आली.

राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीसाठी केंद्र सरकारने ७ लाख ७६ हजार ४६० टन हरभरा खरेदीचे सुधारित उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारने ३० मे २०२२ च्या पत्रान्वये राज्य सरकारला यासंदर्भात कळवले असून १८ जूनपर्यंत हरभरा खरेदीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे चांगले उत्पादन
अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले. जिल्हा पणन महासंघाच्या वतीने नाफेड अंतर्गत जिल्ह्यात सध्या आठ खरेदी केंद्रावर हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू आहे. १८ जूनपर्यंत हरभरा खरेदीस मुदतवाढ मिळाली. केंद्राचे खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ही केंद्र बंद होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन संबंधित खरेदी केंद्रावर आपला हरभरा आणून विक्री करावी.''
हनुमंत पवार, जिल्हा पणन अधिकारी, नगर.

बातम्या आणखी आहेत...