आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुलमोहर रस्ता परिसर हे नगर शहराचे सर्वात प्रथम वसलेले उपनगर आहे. हा रस्ता सावेडी उपनगरातील महत्त्वाचा म्हणून ओळखला जातो. या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित होते, हे काम मार्गी लावण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. नियोजनबद्ध, कायमस्वरूपी व दर्जेदार विकासकामे करणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे.
महापालिका प्रशासनाला या रस्त्याचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले. गुलमोहर रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी जगताप यांनी केली. यावेळी शिल्पकार प्रमोद कांबळे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, निखील वारे, बाळासाहेब पवार, तायगा शिंदे, नगरसेवक सागर बोरुडे, सुनील त्रिंबके, विनित पाऊलबुद्धे, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, मनोज पारखे, सुमित कुलकर्णी, भरत पवार, सचिन जगताप, गणेश देशमुख, बन्सी मिठाईवाले, कृष्णा हिरे, सावन छाब्रा, हर्षल बांगर आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.