आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्री निविदा:म्हाडाच्या 40 गाळ्यांसाठी अर्ज घेण्यास रांगा

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील प्रेमदान चौकात नाशिक गृहनिर्माण- क्षेत्र विकास मंडळाकडून बांधण्यात आलेल्या ४० व्यावसायिक गाळ्यांची गुरुवारपासून विक्री निविदा काढण्यात आली. या गाळ्यांसाठी अर्ज घेणाऱ्या नागरिकांची गुरुवारी म्हाडाच्या सिविल हडको परिसरातील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत गाळ्यांसाठी ३७५ अर्जांची विक्री झाली होती,अशी माहिती म्हाडाचे रेंट कलेक्टर गोरक्षनाथ कडूस यांनी गुरुवारी दिली.

अहमदनगर शहरातील व्यावसायिक परिसर म्हणून ओळख असलेल्या प्रेमदान चौकात म्हाडाने ८ कोटी रुपये खर्च करून व्यावसायिक गाळे उभारले आहेत.प्रेमदान चौकात तीन इमारती आहेत. त्यात व्यावसायिक गाळे आहेत. अहमदनगर शहरातील प्रामुख्याने सावेडी उपनगरातील व्यवसायाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणारा आहे. प्रकल्पातून छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची संधी मिळणार आहे. या इमारतीमधील व्यावसायिक ४० गाळ्यांच्या विक्रीसाठी गुरुवारपासून विक्री निविदा सुरू झाल्या आहेत.

गाळ्यांसाठी अर्ज घेण्यासाठी व्यावसायिकांनी म्हाडाच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक कैलास साळुंखे, रेंट कलेक्टर गोरक्षनाथ कडूस यांनी अर्ज विक्री सुरू केली होती. अर्ज घेण्यासाठी व्यावसायिकांची रांग लागली होती. १२ डिसेंबरला माऊली सभागृहात या निविदा खुला होणार आहे. जानेवारीपासून ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या वर्षात या व्यवसायिक गाळ्यांतून २०० जणांना रोजगार मिळणार आहे.

महिन्याभर अर्ज विक्री
म्हाडाच्या ४० गाळ्यांसाठी अर्ज विक्री ९ डिसेंबर पर्यंत राहणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ही अर्ज विक्री राहील. ५९० रुपये अर्ज विक्रीसाठी रक्कम भरावी लागणार आहे. १२ डिसेंबरला स्वीकृती व निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. अशी माहिती म्हाडाचे रेंट कलेक्टर जी. एन. कडूस यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...