आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे नगर-दौंड रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम समारंभात भाजप नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर भाजपचे अॅड. बाळासाहेब काकडे आणि राष्ट्रवादीचे प्रवीण कुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटा या दोघांमध्ये श्रेयवादावरून वाद निर्माण झाला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
यामुळे कार्यक्रमात राडा झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमाेर श्रेयवादाची ही नामुष्की ओढवली. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. नगर-दौंड रस्त्यावरील लोणी व्यंकानाथ रेल्वे गेट ते लोणी गाव हा दोन किलाेमीटर रस्ता अनेक वर्षांपासून अपूर्ण होता. त्यामुळे अनेकांना अपघातात आपला जीव गमावावा लागला.
या कामाच्या पूर्तेतेसाठी अनेक आंदोलने झाली. रास्ता रोको करण्यात आला. लोकभावना व होणारे अपघात लक्षात घेता खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा करून या रस्त्याच्या कामासाठी केंद्रातून सुमारे ३.५ कोटी रुपये मंजूर करून आणले. रविवारी सकाळी १०.३० वाजता लोणी व्यंकानाथ गावात खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा राज्य बाजार समितीचे सदस्य प्रवीणकुमार ऊर्फ बाळासाहेब नाहाटा तसेच नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाजपचे अॅड. बाळासाहेब काकडे यांचा खासदार डॉ. विखे यांच्यासमोरच श्रेयवाद सुरू झाला. काकडे, नाहाटा यांना उद्देशून म्हणाले, राष्ट्रवादीचा भामटा म्हणतोय विकास निधी मीच आणलाय. त्यावर नाहाटा व नाहाटा समर्थक कार्यकर्ते आक्रमक होऊन काकडे यांच्या दिशेने धावले. त्यांनतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते डॉ. विखे यांच्या समोरच शिवीगाळ करत भिडले. भूमिपूजन कार्यक्रमात गोंधळ उडाला. दरम्यान, तालुक्यात भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांतील राड्याची चर्चा सुरू आहे.
खासदार सुजय विखे यांनी कार्यक्रम घेतला अाटोपता आमदार बबनराव पाचपुते व खासदार डॉ. सुजय विखे यांनी पुढाकार घेऊन नाहाटा व काकडे यांच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सदर कार्यक्रम आटोपता घेतला. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यक्रमांत अश्या प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत राडा झाल्याने श्रीगोंदे तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.