आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल:पोलिस ठाण्यातील राडा अखलपात्र!

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यासह एका महिलेने गुरुवारी रात्री1 पोलिस ठाण्यातच आरडाओरड करून गोंधळ घातला. पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे पोलिस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून केवळ अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बुधवारी पार पडलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चानंतर नगर शहरात विविध घटनांमधून त्याचे पडसाद उमटत आहेत. मोर्चाचे स्टेटस ठेवल्याने विद्यार्थ्यास मारहाण, महाविद्यालयात एकास शिवीगाळ झाल्यानंतर गुरुवारी रात्री तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात याचे पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून काही महिलांना चौकशीसाठी तोफखाना पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.

यावेळी एमआयएम पक्षाचा कार्यकर्ता सरफराज जहागिरदार व पिंकी नामक एका महिलेने पोलिस ठाण्यात आरडाओरड करून गोंधळ घातला. त्यानंतर मोठा जमाव ठाण्याबाहेर जमला होता. पोलिसांनी सर्वांना पिटाळून लावले. या प्रकरणी गोंधळ घालणाऱ्या दोघांविरुद्ध अदखल पात्र गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सरफराज जहागिरदार याला धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी त्याच्या फिर्यादीवरून कुणाल भंडारी, बंटी डापसे, रोहित चंगेडिया, मोहित गांधी यांच्या विरुध्द अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात गोंधळ होऊन जातीय तणाव निर्माण झाला होता. शहरातही सध्या काही प्रमाणात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी अशा प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

हिंदुत्ववादी संघटनेचे पोलिस अधीक्षकांना निवेदन सय्यद मोहम्मद सरफाराज, अमिर शेख, समीर शेख या तिघांनी व महिलांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कांगावा करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणण्यासाठी २०० ते ३०० जणांचा जमाव जमवून खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडले. गुन्ह्यात जी चार नावे घेण्यात आली आहेत त्यामध्ये रोहित चंगेडिया, मोहित गांधी हे दोघेही घटनास्थळी आलेच नव्हते. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

बातम्या आणखी आहेत...