आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा शांत होत नाही तोच शुक्रवारी रात्री भाळवणी येथे दोन गट परस्पराला भिडले. या भांडणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहोकले यांच्या पेट्रोल पंपाच्या केबिनच्या काचा फुटल्या. विरोधी गटाने रोहोकले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.भाळवणीच्या निवडणुकीत विरोधी असलेल्या उमेदवाराशी चर्चा करीत असताना झालेल्या शिवीगाळीतून दोन गट एकमेकांविरोधात भिडले. त्यातून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही गटांवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाले.
विकास रोहोकले यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे, की ५ जानेवारीला रात्री ८ च्या सुमारास ते घरून त्यांच्या कल्याण रस्त्यावरील श्री. माऊली पेट्रोल पंप येथील ऑफिसमध्ये गेले होते. ऑफिसमध्ये कामकाज पाहत असताना अविनाश सूर्यकांत रोहोकले पेट्रोल पंपावर आला. पंपावर असलेल्या कर्मचार्यांशी तो विनाका रण वाद घाल लागला. त्यापाठोपाठ तेथे दत्तात्रय केरूभाऊ रोहोकले, दीपक भागुजी रोहोकले, सूर्यकांत केरूभाऊ रोहोकले हजर होऊन वाद घालून मारहाण करू लागले. त्यापैकी एकाने तेथे असलेला पेव्हींग ब्लॉक उचलून कार्यालयाच्या काचेवर फेकून मारल्याने काच फुटली. त्यांनी पंपावर कामास असलेल्या संदीप पांडूरंग रोहोकले याच्या कडील एक लाख, दिलीप पांडूरंग रोहोकले याच्याकडील दोन तोळे सोने घेतले. पंपाची तोडफोड करून ते तेथून निघून गेले.
दुसरी फिर्याद महिलेने दाखल केली असून रात्री साडेआठच्या सुमारास विकास भाऊसाहेब रोहोकले दोन पांढऱ्या गाडयांसह त्यांच्या घराजवळ आला. दुसर्या गाडयांमध्ये जयसिंग रोहोकले, अक्षय रोहोकले, नामदेव रोहोकले होते. विकासने घरात येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. बाहेर जाताना गळयातील दीड तोळयाचे गंठण घेऊन पळून गेला. दोन्ही गटांच्या फिर्यादींवरून पारनेर पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.