आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमल मरकड:मढी देवस्थानच्या अध्यक्षपदी राधाकिसन मरकड, सचिवपदी विमल मरकड

पाथर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभर ओळख असलेल्या मढी देवस्थानच्या अध्यक्षपदी राधाकिसन अंबादास मरकड, सचिवपदी विमल मरकड तर कोषाध्यक्षपदी भाऊसाहेब मरकड यांची निवड करण्यात आली अाहे. मागील आठवड्यात मढी देवस्थानचे विश्वस्त मंडळातील संजय मरकड यांनी अध्यक्षपदाचा, बबन मरकड यांनी कोषाध्यक्षपदाचा तर विमल मरकड यांनी सचिवपदाचा राजीनामा दिला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत हे राजीनामे मंजूर करण्यात आले. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया रविवारी कानिफनाथ गडावर पार पडली.

देवस्थान समितीचे उपाध्यक्ष सचिन गवारे यांनी अध्यक्षपदाची सूचना मांडली. यावर विश्वस्त तानाजी ढसाळ यांनी अनुमोदन देत राधाकिसन मरकड यांना अध्यक्ष करावे, अशी सूचना केली. त्यानंतर विविध पदांच्या निवडीचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सहसचिवपदी कार्याध्यक्ष डॉ. विलास मढीकर यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष सचिन गवारे व सहसचिव शिवजीत डोके यांची पदे कायम ठेवण्यात आली आहेत. या बैठकीला उपाध्यक्ष सचिन गवारे, सहसचिव शिवजीत डोके, विश्वस्त अर्जुन शिरसाट, शामराव मरकड, रवींद्र आरोळ, तानाजी ढसाळ आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मरकड म्हणाले, देवस्थानची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन पुढील कामे केली जातील. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...