आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाॅंग्रेस पक्षाची भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा. काही तरी एक सांगा तुम्ही काॅंग्रेस पक्षाला सोईनुसार वापरू शकत नाही. पण मुळातः बाळासाेहब थोरात व्यथित झाले की, भूमिका काय घ्यावी असा जोरदार टोला भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
सोईप्रमाणे पक्षाला वापरता येत नाही
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोईप्रमाणे पक्षाला वापरता येत नाही. बाळासाहेब थोरात यांनी काॅंग्रेसचे नेते म्हणून जबाबदारी स्वीकारायला हवी. कारण महाविकास आघाडीचा काॅंग्रेस पक्ष घटक आहे. सोईप्रमाणे पक्षाला वापरता येणार नाही. एक तर काॅंग्रेसबाबत भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, मुळात ते व्यथित झाले की, भूमिका काय घ्यावी.
पक्षाच्या भूमिकेसोबत राहावे
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणूकही संपली आहे. भाजपने दिलेल्या पाठींब्यामुळे निवडून आले. उद्याच्या काळात त्यांनी पक्षाच्या भूमिकेसोबत राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे.
काय म्हणाले होते थोरात?
बाळासाहेब थोरात कालच म्हणाले होते की, ''मधल्या काळात आणखी एक राजकारण झाले. विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झाले. सत्यजित खूप चांगल्या मतांनी निवडून आला. त्याचे अभिनंदन पण जे राजकारण झाले ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तूस्थिती आहे. मी माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या. पक्षाच्या राजकारणाविषयी बाहेर बोलावे हा माझा स्वभाव नाही. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करू
माझ्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्या
बाळासाहेब थोरात म्हणाले, मी माझ्या भावना काॅंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. हे बाहेर बोलू नये या मताचा मी कायम आहे. त्यामुळे त्या बाबतीत जे काही आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवले आहे. पक्ष आणि माझ्या पातळीवर योग्य निर्णय घेऊ. जे काही करायचे ते योग्य करू.
पार भाजपपर्यंत आपल्याला नेऊन पोहचवले
आपण काही काळजी करू नका. काॅंग्रेसचा विचार हा आपला विचार आहे. मधल्या काळात अशा काही बातम्या आल्या की, आपल्याला पार भाजपपर्यंत नेऊन पोहचवले. भाजपच्या तिकीटाचे वाटपही त्यांनी करुन टाकल्या. काही लोकांनी गैरसमज पसरवला. ते कशा पद्धतीने गैरसमज करतात हे पाहीले अनेक चर्चाही त्यांनी घडवून आणल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.