आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखे पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल:म्हणाले - आयोध्येला गेले म्हणजे हिंदुत्व सिद्ध होत नाही; आदित्य ठाकरेंची कीव येते, ते अजून परिपक्व नाहीत

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची मला कीव येते. ते अजून लहान आहेत त्यांना राजकारणाचे धडे घेण्याची गरज आहे. असा टोला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. कोणी आयोध्येला जाणार म्हणून अयोध्येला जाऊन हिंदुत्व सिद्ध होत नाही असा खोचक टोला विखेंनी लगावला आहे.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
सत्तेसाठी शिवसेनेने तडजोडी केल्या आहेत, त्या संपूर्ण राज्याने पाहिले असून ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असे विखेंनी म्हटले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्‍या पध्‍दतीने हिंदूत्‍वाचा पुरस्कार केला, त्‍याबद्दल लोकांच्‍या मनात आदर होता. त्‍यांनी सत्तेसाठी विचारांची कधीही तडजोड केली नाही. मात्र आता शिवसेना सत्तेसाठी तडजोड करत सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे राज्यातील जनता तुम्हाला धडा शिकवेलच असे त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेचे प्रवक्‍ते रोज जी विधाने करत असतात ते केवळ शिवसेनाप्रमुखांचे विचार संपविण्‍यासाठीच आहेत, अशी जहरी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे?
मुख्यमंत्र्यांनी मास्क काढून सभा घेणार असल्याचे सांगत, 14 मे रोजी सभेचे आयोजन केले आहे. यावर टीका करताना विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मास्क काढून बोलताना कोणाचेही मास्क उतरावेत, आम्हाला त्याची चिंता नाहीच, पण त्यांनी मास्क काढण्याचा निर्णय केलाच असेल तर राज्याच्या प्रलंबित प्रश्नांवर बोलायला पाहिजे. मास्क काढण्याचा निर्णय केल्याने मुख्यमंत्री आता जनतेला दिसतील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलते तरी होतील, अशी अपेक्षा आहे. असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

बातम्या आणखी आहेत...