आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकरी फिरवण्याऐवजी:पवारांनी शब्द फिरवला, ठाकरेंनी भूमिका बदलली; राधाकृष्ण विखे-पाटील यांची खोचक टीका

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी भाकरी नव्हे, तर सवयीप्रमाणे शब्द फिरवला आहे. तर ठाकरेंनी भूमिका बदलली आहे, अशी खोचक टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्याच्या हस्ते अहमदनगरमध्ये सरकारी वाळू ठेक्याचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यावर भाजपमधून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भाकरी फिरवण्याऐवजी...

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, खरे तर शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. मात्र, स्वतः शरद पवारांनी भाकरी फिरवली पाहिजे, असे म्हटले होते. पण त्यांनी भाकरी फिरवण्याऐवजी सवयीप्रमाणे आपला शब्द फिरवला, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

राजकीय हवा दिली...

आज उद्धव ठाकरे यांनी बारसू, सालेगावला भेट दिली. यावरही विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरेंची नाणारवेळी वेगळी आणि आता वेगळी भूमिका आहे. ते नेहमी भूमिका बदलतात. मात्र, सरकारची स्थानिकांशी चर्चा सुरू आहे. तर ठाकरे बारसू प्रकल्पाला काहीही कारण नसताना राजकीय हवा देत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शरद पवारांचे स्वागत

दुसरीकडे शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जल्लोष आहे. ठाण्यात त्यांच्या समर्थनार्थ पु्न्हा एकदा पोस्टर लागले आहेत. त्यावर साहेब मैदानात, असा उल्लेख केला आहे. शरद पवार आज बारामतीमध्ये आले. तेव्हा त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

संबंधित वृत्तः

शरद पवारांकडून राजीनामा मागे, अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली; पत्रकार परिषदेत घोषणा

शरद पवारांच्या राजीनाम्याने अजितदादा चेकमेट; विरोधकांना कात्रजचा घाट, जाणून घ्या 8 कलमी पावर गेम!

राजीनामा फेटाळल्याचे कळवले, पण शरद पवारांनी वेळ मागितला; प्रफुल्ल पटेलांची माहिती