आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला पुढे नेण्यासाठी जनतेने साथ द्यावी:राधाकृष्ण विखे; 'भूईकोट'च्या पर्यटन वृद्धीसाठी नियोजन करण्याच्या सूचना

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध स्टार्टअप योजनांद्वारे महाराष्ट्र राज्याला देशामध्ये अग्रगण्य राज्य करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेला नाग‍रिकांनी साथ द्यावी आणि आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सोमवारी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथील पोलिस परेड ग्राऊंडवर ​​​​​​ध्वजवंदन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.

नगर जिल्ह्याचे मोठे योगदान

विखे यांनी प्रारंभी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा कालखंड खुप मोठा आहे. या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. नगर जिल्ह्याचे स्वातंत्र्य लढ्यात लक्षणीय योगदान असून, येथील भूईकोट किल्ला त्याचा साक्षीदार आहे.

मानवंदना स्वीकारली

विविध उपक्रमांद्वारे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' या संकल्पनेतून बलशाली भारताची निर्मिती होणार आहे. असे त्यांनी सांगितले.या समारंभात पोलिस परेडची पाहाणी करुन त्यांनी मानवंदना स्विकारली.

'भूईकोट'च्या पर्यटन वृद्धीसाठी नियोजन करा

नगर जिल्हयाचे स्वातंत्र्य लढयात लक्षणीय योगदानाचे प्रतिक असलेल्या येथील भूईकोट किल्‍ल्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. भूईकोट किल्ला परिसरात पर्यटनवृध्दीसाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

या समारंभात जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिक, शहिद सैनिकांचे कुटूंबीय, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, महानगर पालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, स्थानिक लोकप्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...