आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Chandrasekhar Bawankule | ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​Ahmednagar District BJP Three District Presidents Change |​​​​​​​

खांदेपालट:अहमदनगर जिल्हा भाजपचे तिन्ही जिल्हाध्यक्ष बदलणार; प्रदेश कार्यकारिणीत आगरकर, गांधी, वाकचौरेंचा समावेश

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपच्या प्रदेश चिटणीस पदावर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांचा समावेश ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​​

कार्यकाळ पूर्ण झालेल्या भाजपचे नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्ष संकेत मिळत असून, 16 में ला नगर शहर,नगर दक्षिण व नगर उत्तर जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार आहेत. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार (3 में ) ला जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारणीत अहमदनगर जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे, तर नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना प्रदेश चिटणीस पद देण्यात आले आहे.

प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून ज्येष्ठ नेते अभय आगरकर, जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान शहराध्यक्ष भैया गंधे यांच्यासह माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा असली तरी शहर जिल्हाध्यक्ष पद आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी विखे गटाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रक्षेकर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारणी जाहीर केल्यानंतर लगेचच जिल्हाध्यक्ष बदलांच्या हालचालींना देखील वेग आला आहे ‌. विद्यमान जिल्हाध्यक्षांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नगर शहर, नगर दक्षिण व नगर उत्तर जिल्हाध्यक्ष बदलण्यात येणार असून, सर्वाधिक इच्छुक

नगर शहराध्यक्ष पदासाठी आहेत. भाजपचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी शहराध्यक्ष पद पुन्हा मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असतानाच माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी यांच्यासह विखे गटातील धनंजय जाधव व अन्य पदाधिकारी देखील शहराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये आले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक असली तरी कुठल्या नावावर प्रदेश पातळीवरून शिक्कामोर्तब होणार हे मात्र १६ मे नंतर स्पष्ट होणार आहे.

नगर उत्तर जिल्हा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर या पदासाठी पुन्हा इच्छुक असले तरी उत्तरेतून नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी विखे गट आग्रही आहे. जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्यासह प्रकाश चित्ते यांचेही जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांची प्रदेश कार्यकारणी चिटणीस पदावर नियुक्ती झाल्यामुळे दक्षिणेतून अनेक जणांनी त्यांच्या जागेवर जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. भाजपचे निष्ठावंत असलेले बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग यांच्या नावाची चर्चा असून, दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष पद विद्यमान आमदार मोनिका राजळे गटाला मिळावे यासाठी त्यांची प्रयत्न सुरू आहेत.