आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार:मुळा कारखाना ४ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती करणार, आमदार शंकरराव गडाख यांनी दिली माहिती

सोनई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा कारखान्याच्या नवीन इथेनॉल प्रकल्पातून सन २०२१-२२ च्या हंगामात सव्वा कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती झाली आहे. आता ऑक्टोबर मध्ये सुरू होणाऱ्या हंगामात ४ कोटी लिटरचे इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.

गुरुवारी झालेल्या मुळा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला माजी खासदार कारखान्याचे संस्थापक ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, कारखान्याचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

आमदार गडाख म्हणाले, इथेनॉलचे दर शासनाने निश्चित केलेले आहेत. इथेनॉल उत्पादनाला शासनाचे प्रोत्साहन आहे. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने इथेनॉल निर्मितीला देशात महत्त्व दिलं जात आहे. मुळा कारखान्याने इथेनॉल प्रकल्प उभारून १ लाख लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मितीची क्षमता निर्माण केली असून त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी प्रकल्प उशिरा सुरू झाल्याने सव्वा कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. पण आता ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात ४ कोटी लिटर इथेनॉल ची निर्मिती केली जाईल. ऊस उत्पादकांना फरक रकमेचे पेमेंट दिवाळीपूर्वी करण्यात येईल

आमदार गडाख म्हणाले, इथेनॉलचे दर शासनाने निश्चित केलेले आहेत. इथेनॉल उत्पादनाला शासनाचे प्रोत्साहन आहे. आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने इथेनॉल निर्मितीला देशात महत्त्व दिलं जात आहे. मुळा कारखान्याने इथेनॉल प्रकल्प उभारून १ लाख लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मितीची क्षमता निर्माण केली असून त्यासाठी ९० कोटी रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी प्रकल्प उशिरा सुरू झाल्याने सव्वा कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली. पण आता ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात ४ कोटी लिटर इथेनॉल ची निर्मिती केली जाईल. किमान १२५ लाख टन साखर निर्यातीला केंद्राने परवानगी द्यावी. पुढील साखर हंगामात देशात जवळपास ३६० लाख टन तर महाराष्ट्रात १४५ लाख टन साखर निर्मिती होण्याचा अंदाज आहे. साखर कारखान्याचे शिल्लक साठे कमी करून आर्थिक तरलता येण्यासाठी तसेच स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्याच्या दृष्टीने किमान १२५ लाख टन साखर निर्यात करण्यास केंद्र सरकारने कारखान्यांना परवानगी द्यावी अशी मागणी आमदार शंकरराव गडाख यांनी केली. उसाचा दर २४३५ प्रमाणे जाहीर करून पूर्वी दिलेली रक्कम वजा जाता फरक रकमेचे पेमेंट दिवाळीपूर्वी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून मागील सभेचे इतिवृत्त व अहवालाची माहिती दिली.

मुळा साखर कारखान्याच्या सोनई वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना आमदार शंकरराव गडाख. समवेत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख.

१० हजार टन विस्तार वाढीला मंजुरी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी १४ ते १५ लाख टन ऊसाचे उत्पादन होते. उशिरापर्यंत कारखाना चालवावा लागतो. उन्हाळ्यात मजुरांची ऊस तोडण्याची क्षमता कमी होते. जायकवाडी धरण भरलं नाही तर मुळा धरणाचे पाणी मराठवाड्याला जाते. म्हणून ज्यादा क्षमतेने गऴीत करून हंगाम १५ किंवा ३० एप्रिल अखेर चालवल्यास ते सभासदांच्या दृष्टीनेही लाभदायक ठरेल. म्हणून कारखान्याची गाळप क्षमता ७ हजार टनावरून १० हजार टनापर्यंत करण्यास सभासदांनी मंजुरी दिल्याबद्दल आमदार गडाख यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...