आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची गैरसोय:राहाता शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा

राहाता3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे. राहाता नगर परिषदेचे पिण्याच्या पाण्याचे साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरलेले आहेत. तरी राहाता शहराला रोज पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्यावतीने शहराध्यक्ष नितीन सदाफळ व युवानेते अॅड समीर करमासे यांनी केली आहे. अॅड. करमासे म्हणाले, आम्ही पाणीपट्टी कर नियमितपणे भरतो तरी अनेक वर्षांपासुन राहाता नगरपालिकेकडून ४ ते ५ दिवसातुन एकदा शहराला सुमारे एक तास पाणीपुरवठा केला जात आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

नगर परिषदेने न. पा. वाडी रस्त्यालगत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करुन नागरिकांच्या पाण्याची दररोजची गरज पूर्ण करावी. या प्रकल्पाचे ८० टक्के काम झालेले आहे. परंतु अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रेंगाळलेले आहे. राहिलेले काम पूर्ण केल्यास शहराला दररोज पाणी उपलब्ध होऊ शकतो. पुढील येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीची सत्ता आल्यास रोज नियमीत पाणीपुरवठा करण्याचा अजेंडा राहील, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...