आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता बाजार समितीत डाळिंबाला प्रतिकिलो 200 रुपये भाव:12397 क्रेटची आवक, सोयाबीनला 5858 रुपये दर

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (24 ऑगस्ट) 12 हजार 397 क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. सायंकाळी झालेल्या लिलावात एक नंबरच्या डाळिंबाला सर्वाधिक प्रतिकिलो 126 ते 200 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या डाळिंबाला प्रतिकिलो 81 रुपये ते 125 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र 76 हजार 172 हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक 37 हजार 677 हेक्टर क्षेत्र डाळिंब बागाखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात. राहाता बाजार समितीत बुधवारी शेतकऱ्यांनी 12 हजार 397 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक 126 रुपये ते 200 रुपये भाव मिळाला.

भावात किंचीत चढउतार

दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 81 ते 200 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 41 ते 80 रुपये, तर चार नंबर दर्जाच्या डाळिंबांना प्रतिकिलो 10 ते 40 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राहाता बाजार समितीत मागील आठवड्यापासून डाळिंबाच्या भावात किंचीत चढउतार सुरू होते. परंतु बुधवारी झालेल्या लिलावात डाळिंबाच्या भावात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.

शेतमालाला चांगला भाव

राहाता बाजार समितीत बुधवारी कांद्याचे लिलाव झाले नाही. परंतु मंगळवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 1400 ते 1800 रुपये भाव मिळाला होता. 23 ऑगस्ट रोजी 22 हजार 903 कांदा गोण्यांची आवक झाली होती. शेतकऱ्यांनी राहाता बाजार समितीत आपला शेतमाल प्रतवारी करून आणावा. प्रतवारी केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळतो, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

सोयाबीनला 5858 रुपये भाव

राहता कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (24 ऑगस्ट) 35 क्विंटल सोयाबीनची अवस्था झाली होती. सायंकाळी झालेल्या लिलावामध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान 5850, तर कमाल 5858 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...