आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन:राहाता तालुका गणित व साहित्य प्रदर्शन ऑनलाईन

लोणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व राहाता तालुका विज्ञान, गणित अध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने बालवैज्ञानिक व शिक्षकांसाठी ऑनलाइन तंत्रज्ञानाचा उपयोग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले. प्रत्येक मॉडेलचे अत्यंत सूक्ष्म परीक्षण व मूल्यांकन पंचायत समिती कार्यालयामध्ये तज्ञांमार्फत करून निकाल जाहीर करण्यात आला.

उच्च प्राथमिक विद्यार्थी गणित गट ६ वी ते ९ वी प्रथम क्रमांक - लाळगे ओम प्रकाश, यशवंतराव चव्हाण माध्य विद्यालय राजुरी, उपकरण - गणिती कोडे. द्वितीय - मंडलिक कृष्णा प्रकाश , पदमश्री विखे पाटील सैनिक स्कुल लोणी, गणिती तक्त्यावरून वय शोधणे. तृतीय - जेजुरकर अथर्व राहुल, डहाणूकर इंग्लिश स्कुल टिळकनगर, पूर्णांकांचा गुणाकार. उच्च प्राथमिक विद्यार्थी विज्ञान गट - ६ वी ते ८ वी प्रथम क्रमांक - पाटील दिव्या व्यंकटेश, प्रवरा पब्लिक स्कुल प्रवरानगरस्मार्ट डस्टबिन. द्वितीय - हिरोळे ओंकार केदार, विखे पाटील सैनिकी स्कुल लोणी, वॉटर टॅंक. तृतीय - गोरे प्रथमेश आप्पासाहेब, यशवंतराव चव्हाण माध्य विद्यालय राजुरी, स्मार्ट खेडे.

माध्यमिक विद्यार्थी गणित गट - ९ वी ते १२ वी प्रथम - कांडेकर वैष्णवी बस्तीराम , प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी, उपकरण - पायथागोरस प्रमेयाचे उपयोजन. द्वितीय - आहेर तनिष्का राजेंद्र, महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर, गणितीय उपकरण. तृतीय - सुतार ईश्वरी मनोज, भगवतीमाता विद्या मंदीर कोल्हार भगवतीपूर, मॅजिकल बोर्ड. माध्यमिक विद्यार्थी विज्ञान गट - ९ वी ते १२ वी प्रथम क्रमांक - जाधव कृष्णा अनिल, श्री गणेश विद्यालय गणेशनगर, पीक संरक्षण यंत्र. द्वितीय - राठी ओम भरत, सोमय्या विद्या मंदीर लक्ष्मीवाडी, ऑटोस्लिप आलाराम.

तृतीय - आहेर नयन अरुण, महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर, सायकल खुरपणी यंत्र. जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन सुनील गायकवाड, राजेश पावसे, संजीवन दिवे, बबन आंधळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...