आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील रांजगणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक यंदाही बिनविरोध पार पडली. राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचे १३ संचालक बिनविरोध विजयी झाले.स्वातंत्र्यपूर्व काळात ७७ वर्षापूर्वी,१९४५ साली स्थापना झालेल्या या संस्थेची आतापर्यंत केवळ दोनदा निवडणूक झाली आहे.त्या निवडणुकांमध्येही शिंदे कुटुंबाच्या मंडळाचा मोठा विजय झाला होता. त्यानंतर मात्र सातत्याने निवडणूक बिनविरोध होत आहे.
तालुक्यात सर्वात जास्त, १ हजार २७५ सभासद असलेल्या या संस्थेची बँक पातळीवरील वसुली नेहमीच १०० टक्के राहिली आहे.संस्थेने ९ कोटी रुपये कर्जवाटप केले आहे. कर्जाची परतफेड वेळेवर करण्याची शिस्त सभासद पाळत असल्याने संस्था आर्थिक दृष्टया सक्षम असल्याचे राहूल शिंदे यांनी सांगितले. विजयानंतर शिंदे समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करीत जल्लोष केला.विजयी उमेदवारांचा राहुल शिंदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विविध मतदारसंघात बिनविरोध विजयी झालेले नवविर्वाचित संचालक पुढील प्रमाणे : सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी : अभिजित विलासराव शिंदे, प्रभाकर गुलाबराव देशमुख, प्रकाश शंकर गाढवे, दिनकर सिताराम शिंदे, अनिल बाबासाहेब जवक, अस्लम रज्जाक मन्यार, बापूसाहेब जयसिंग जवक, प्रमोद किसन गाढवे,अनुसूचित जाती, जमाती प्रतिनिधी : लक्ष्मण सिताराम साळवे. महिला प्रतिनिधी : अनिता नानासाहेब इकडे, लिलाबाई पोपट लोणकर, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : ओंकार बाळासाहेब सोनवणे. विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी : स्वामीनाथ बापू तागड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.