आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागा एक इच्छुक अनेक अशी अवस्था राहुरीच्या भाजप तालुकाध्यक्ष निवडीची झाल्याने कोअर कमेटीमध्ये चर्चा करून अगामी दोन दिवसांत या पदाची निवड घोषित करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिली. राहुरी तालुका भाजप अध्यक्ष निवडीसाठी मुळा प्रवराच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. तालुकाध्यक्ष पदासाठी तब्बल २८ नावे पुढे आली.
सर्वच कार्यकर्ते आपल्या मताशी ठाम राहिल्याने भाजप तालुकाध्यक्ष निवडीचा तिढा कोअर कमेटीकडे सोपवण्यात आला. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
या बैठकीत भाजपचे प्रकाश पारख, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर यांनी आपली मते मांडली. राहुरी तालुकाध्यक्ष पदासाठी सुरेश बानकर, रवींद्र म्हसे, अनिल आढाव, प्रकाश पारख, सुभाष गायकवाड, विक्रम तांबे, विजय बानकर, मच्छिंद्र गावडे, राजेंद्र गोपाळे, राजेंद्र करपे, राधाकिसन देवरे, अण्णासाहेब बलमे, राजेंद्र दरक, सर्जेराव घाडगे, नानासाहेब गागरे, नारायण धनवट, नानासाहेब तरवडे, सुरेश थेवरकर, बाबासाहेब थोरात, कडुबा म्हसे, चांगदेव किणकर, भीमराज काकडे, धिरज पानसंबळ, सुकुमार पवार, ज्ञानदेव शिंदे, काळे या इच्छुकाची नावे पुढे आली. बैठकीला माजी आमदार चंद्रशेखर कदम उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.