आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Rahuri Police Performance Passing An Accused Taking Advantage Of The Darkness; Four Criminals From Nashik District Who Came For Robbery Were Caught |marathi News

राहुरी पोलिसांची कामगिरी:दरोडा टाकण्यासाठी आलेल्या नाशिक जिल्ह्यातील चौघा गुन्हेगारांना पकडले

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मल्हारवाडी रस्त्यालगत असलेल्या वसाहतीत दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार गुन्हेगारांना राहुरीच्या पोलिस पथकाने वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला. शनिवारी पहाटे अडीच वाजेदरम्यान राहुरी मल्हारवाडी रस्त्यालगत असलेल्या वसाहतीत पाेलिसांनी ही कारवाई केली. नाशिक व निफाड भागातील गुन्हेगारांनी राहुरी शहर हद्दीत असलेल्या मल्हारवाडी रस्त्यालगतच्या वसाहतीला लक्ष केले होते.

पहाटेच्या वेळेत वसाहतीतील जागे झालेल्या नागरिकास पाच गुन्हेगारांच्या संशयीत हालचाली दिसुन आल्या. त्यामुळे राहुरी पोलिसांशी संपर्क करण्यात आला. घटनेची खबर मिळताच राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक निरज बोकील, काॅन्सटेबल आजिनाथ पाखरे, हवालदार नदीम शेख, साखरे, सोमनाथ जायभाये हे पथक मल्हारवाडी रस्यालगतच्या वसाहती जवळ दाखल झाले.

पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने अंधारात दबा धरून बसलेल्या पाच गुन्हेगारांनी घटना स्थळावरून पळ काढला. पोलीसांनी पाठलाग करत मयूर राजू ढगे व ईश्वर अशोक मोरे, रा. नाशिक या दोघांना जेरबंद केले.यावेळी गुन्हेगारांच्या धरपकडीत उपनिरीक्षक बोकील यांच्या हाताला सत्तूर लागल्याने ते जखमी झाले. अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या तिघापैकी रमेश वाकोडे व रणजित कांबळे, रा. निफाड ( नाशिक ) या दोघांचे शिर्डीत लोकेशन मिळाल्याने राहुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले. तर अजय पवार रा. निफाड हा फरार झालेला गुन्हेगार शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत सापडू शकला नाही. राहुरी पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या चार गुन्हेगारांकडे १ सत्तूर व १ लोखंडी टाॅमी सापडली. पकडलेल्या मयूर राजू ढगे याच्यावर नाशिक शहरामध्ये प्रॉपर्टी व इतर १२ गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...