आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यानंतर त्यांनी पोलिसांवर हल्ला केला यात पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले आहेत. पहाटे ३ वाजेच्या सुमारास हजर झाले. पोलिसांना पाहून सुसाट पळालेल्या दरोडेखोरांना पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये नाशिक येथे गंभीर प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असलेले दोघांना पोलिसांनी पकडले
प्रमोद रत्नाकर भागवत हे राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडलगत असलेल्या सातपीर दर्गा परिसरात राहतात. ते त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन पाच दरोडेखोरांनी काल शनिवार दि. 4 जून रोजी पहाटे 3 च्या दरम्यान त्यांच्या घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी प्रथम वाचमनला मारहाण करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खुर्चीवर बांधून ठेवले. नंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी घरातील सुमारे 42 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने घेतले.
त्याचबरोबर त्यांच्या शेजारील दोन घरात दरोडा टाकून पळून जाण्याच्या तयारीत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला गुप्त खबर्यामार्फत घटनेची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, हवालदार महेश शेळके, आजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाय, पोलिस नाईक नदीम शेख, जालिंदर साखरे आदी पोलिस पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. सिने स्टाईलने दरोडेखोरांचा पाठलाग केला.
मयुर राजु ढगे, ईश्वर अशोक मोरे, रंजीत केशव कांबळे, अजय पवार, राहुल रमेश वाकोडे अशी आरोपींची नावे आहेत. जखमी झालेले पोलिस उपनिरीक्षक नीरज जयंत बोकील यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (४ जून) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राहुरी येथील मल्हारवाडी रोडवर सातपिर बाबा दर्गाजवळ हा सिनेस्टाईल थरार रंगला. सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला आहे.
आरोपींनी दरोडा टाकल्यानंतर धूम ठोकण्याच्या तयारीत होते. यावेळी राहुरी पोलिसांच्या पथकाने संशयावरुन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका आरोपीने उपनिरीक्षक बोकील यांच्यावर सत्तूरने हल्ला केला. यात ते जखमी झाले आहेत. पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपींना जेरबंद केले.
आरोपींकडून लोखंडी सत्तुर, मोबाईल फोन, मोटारसायकल, लोखंडी कटावणी, सोने -चांदीचे दागीने, आधाराकार्ड, पाकीट, पर्स, रोख रक्कम साहीत्य व साधानासह 1 लाख 83 हजारांचा माल जप्त केला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.