आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरवस्था:राहुरीच्या शवविच्छेदन केंद्राला गवताचा विळखा, सोयीसुविधांचा उडाला बोजवारा

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरीच्या शवविच्छेदन केंद्राला निरूपयोगी गवताचा विळखा पडल्याने शवविच्छेदनासाठी येणाऱ्या मृतदेहाची विटंबना सुरू आहे. नगर-मनमाड राज्य महामार्गालगत मुळा नदी पुलाजवळ असलेल्या राहुरीच्या शवविच्छेदन केंद्राची दयनीय अवस्था झाली आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारित असलेले शवविच्छेदन केंद्रात सोयीसुविधांचा बोजवारा उडाल्याने हे केंद्र कायमच वादग्रस्त ठरले आहे. नगर-मनमाड राज्य महामार्गावर मालवाहतूक व इतर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने राहुरी हद्दीत अपघाताच्या लहान मोठ्या घटना कायमच घडत आहेत. नदीपात्र तसेच विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा शॉक लागून मृत्यू, सर्पदंश, विष प्राशन, अपघात, खून, गळफास या विविध घटनांत मृत्यू पावलेल्या नागरिकांना शवविच्छेदनासाठी या केंद्रात आणले जाते. महिन्याभरात किमान १० शवविच्छेदन केले जात असल्याने या केंद्रात आवश्यक सोयीसुविधा तसेच परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. मात्र, मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगून शवविच्छेदन केंद्राच्या परिसराची स्वच्छता करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळटाळ केली जात आहे.

शवविच्छेदन केंद्राला निरोपयोगी गवताचा वेढा पडल्याने या परिसरात उंदिर, घुशी व सापाचा वावर वाढला आहे. शवविच्छेदन केंद्रात बेवारस ठेवलेले मृतदेह उंदिर व घुशीने कुरतडण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनास जाग आलेली नाही. नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या राहुरीच्या शवविच्छेदन केंद्र परिसरात मृत जनावरे आणून टाकली जात आहेत. तसेच राहुरीत जागेची पर्यायी व्यवस्था नसल्याने बेवारस मृतदेह दफन करण्यासाठी याच परिसराचा वापर होत आहे. हा परिसर स्वच्छ ठेवला जात नसल्याने शवविच्छेदनासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...