आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंटरवर छापा:शहरातील बेकायदा गॅस रीफिलिंग सेंटरवर छापा ; आरोपीविरुद्द गुन्हा दाखल

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बेकायदेशिररित्या गॅस टाक्यामधून गॅस रिफीलींग करून मशीनद्वारे वाहनामध्ये गॅस भरत असलेल्या ठिकाणी पुरवठा विभागाने छापा टाकून कारवाई केली. नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल जयआनंदच्या मागे हा उद्योग सुरू होता. या प्रकरणी प्र.पुरवठा निरीक्षक जयंत कान्हू भिंगाददिवे (वय ५३, रा. सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पवन भिंगारदिवे (रा. सावेडी गावठाण) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या छाप्यादरम्यान तीन रिक्षा, गॅस रिफीलींग मशीन, रबरी पाईप व वजनकाटा असा ऐवज जप्त केला आहे. पवन भिंगारदिवे गॅस टाक्यामधून गॅस रिफीलींग करून मशीनद्वारे वाहनात गॅस भरत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने कारवाई केली. पवन भिंगारदिवे हा घरगुती वापराच्या गॅस टाक्यामधून गॅस रिफीलींग करून मशीनद्वारे प्रवासी रिक्षामध्ये गॅस भरत असल्याचे निदर्शनास आले.