आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 लाखांचा मुद्देमाल जप्त:जुगार अड्डयावर छापा ; 28 जणांना अटक

कोपरगाव शहर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना ठाकरे गटाच्या व्यापारी सेनेच्या तालुका प्रमुखांच्या शहरातील टाकळी फाटा धोंडिबानगर येथील इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या २८ जणांना अटक केली. यात साडे तेवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.धोंडिबानगर येथे योगेश मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही व्यक्ती जुगार खेळतात, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नगर, शिर्डी पोलिस ठाणे व कोपरगाव पोलिसांनी तेथे छापा टाकला.

शेखलाल शेख चाँद, रा. चर्च रोड कोपरगाव, शीतल लोहाडे रा. सावतानगर मालेगाव, विजय निमसे रा. रमाबाईनगर मनमाड, नंदू नजन रा. बनरोड राहाता, इम्रान मोमीन रा. जमदाडे चौक मनमाड, कलिम बागवान रा. इंदिरानगर, कोपरगाव, अश्पाक शेख रा.शांतीनगर मनमाड, नितीन शेजवळ रा. राजवाडा, लासलगाव, राहुल पाराशेर रा. मनमाड आनंदवाडी, नाना डोळस रा. सुभाष नगर, कोपरगाव, शेख हाशम रा. खडकी, सुरेश सातभाई रा. येवला, गणेश जेजुरकर रा. पानमळा, सोमनाथ वाळके रा. लासलगाव, अनिल खरात रा. लासलगाव, योगेश रासकर रा. येवला, दीपक उंबरे रा. येवला, कैलास मुंजळ रा. महादेव नगर, तुषार दुशिंग रा. टिळकनगर, मोहसीन सय्यद रा. सुराला ता. वैजापूर, दीपक बनसोडे रा. स्वामी समर्थ नगर, वैजापूर, रविंद्र सानप रा. कोपरगाव, हरिलाल डांच रा. संगमेश्वर, मालेगाव, सुदाम नवले रा. तांबोळ, सुभाष चावडे रा. बाभुळवंडी, हरी करवर बाभुळवंडी, विरेंद्र परदेशी रा. येवला,यूनुस शेख रा. खडकी या २८ जणांना अटक केली.त्यांच्याकडून रोख २ लाख ५ हजार ६७० व ३० मोबाइल व चार कार, व ७ दुचाकी असा एकूण २३ लाख ३५ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पो. ना. शंकर चौधरी यांचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोिलस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...