आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:भिंगारमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 11 जणांना अटक, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घराच्या वरच्या मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार खेळत असलेल्या ११ जणांना पोलिसांनी छापा टाकून पकडले. रविवारी रात्री भिंगार शहरातील वडारवाडी भागात भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार भानुदास खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. आदिनाथ दगडू धिरडे (वय ४५), राजेंद्र शिवाजी दिवटे (वय ६२), शिवाजी बादशाह निस्ताने (वय ५२), प्रकाश गोविंद वराडे (वय ६३), हरीशचंद्र मारूती नागापुरे (वय ६५), ताराचंद्र मारूती नागापुरे (वय ६४), अशोक केशव माने (वय ५६), मनोज यशवंत धंडारे (वय ४२), भास्कर आसाराम जाधव (वय ४२), सय्यद मोहंमद युसूफ (वय ५४), सोमनाथ दिलीप आहेर (वय ३६, सर्व रा. भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्‍यांची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ हजार रूपये रोख रक्कम, ४१ हजाराचे मोबाईल, एक लाख ९५ हजारांच्या दुचाकी असा दोन लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वडारवाडी येथील सिटीझन कॉलनीमध्ये राजेंद्र शिवाजी दिवटे याच्या घरामध्ये तिरट जुगार खेळला जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती. सहायक निरीक्षक देशमुख यांनी उपनिरीक्षक किरण सोळुंके यांच्यासह पथकातील अंमलदारांना सोबत घेत राजेंद्र दिवटे याच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी ११ जण जुगार खेळताना मिळून आले.

बातम्या आणखी आहेत...