आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरात पतंग-मांजा विक्रेत्यांवर छापेमारी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सर्रास चायना मांजाचा वापर व विक्री सुरू असल्याकडे लक्ष वेधत जाणीव फाउंडेशनच्या वतीने बुधवारी आयुक्त पंकज जावळे व अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच शहरात महापालिकेच्या पथकांनी पतंग व मांजा विक्री करणाऱ्या दुकानांवर छापेमारी सुरू केली. मात्र, एकाही ठिकाणी मनपाला चायना मांजा आढळून आला नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे शहरात चायना मांजाचा वापर सर्रासपणे सुरू असल्याने विक्री कुठून होते, याचा शोध घेण्याची गरज आहे.

चायना मांजामुळे शहरात अनेक जण जखमी झाले आहेत. खुद्द महापालिकेचे प्रसिद्ध अधिकारी शशिकांत नजान यांनाही चायना मांजामुळे काही दिवसांपूर्वी दुखापत झाली. चायना मांजामुळे जखमी झालेल्या दोन ते तीन व्यक्तींसह जाणिव फाउंडेशनच्या सदस्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यांनी पोलिस अधीक्षकांनाही निवेदन दिले. त्यानंतर काही वेळातच महापालिकेच्या पथकांनी शहरातील विविध ठिकाणी जाऊन पतंग व मांजा विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी केली. तपासणीत कोठेही चायना माझ्या आढळला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

चायना मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असून, महापालिका प्रशासनाने पोलिस प्रशासनाची मदत घेऊन शहरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जाणीव फाउंडेशनने केली. यावेळी ॲड. विक्रम वाडेकर, प्रदीप वाखारे, कैलास दिघे, राहुल जोशी, महेंद्र नांदुरकर, सतीश शिंदे, बाळासाहेब पवार, भूपेंद्र रासने, विकास गायकवाड उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...