आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस रिफीलींग:दोन बेकायदा गॅस रिफिलींग सेंटरवर छापे

नगर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनापरवाना गॅस टाक्यामधून गॅस रिफीलींग करून मशीनद्वारे वाहनांमध्ये भरत असल्याचा उद्योग शहरात सुरू आहे. पुरवठा विभागाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. सावेडी उपनगरात एका ठिकाणी कारवाई केल्यानंतर बोल्हेगाव उपनगरात कारवाई केली. यानंतर बुधवारी सावेडी उपनगरात दोन ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली. या प्रकरणी पुरवठा निरीक्षक जयंत भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सहकारनगर परिसरातील यशश्री स्कूल शेजारी एका जागेत एका शेडमध्ये अनधिकृत गॅस रिफीलींग सुरू असलेल्या ठिकाणी पुरवठा विभागाने कारवाई केली. सदर ठिकाणी दोन वर्षापासून शाहरूख निसार शेख (वय २६, रा. भिंगादिवे मळा, सावेडी) हा अवैध व्यवसाय करत असल्याचे समोर आले. शुभम ऊर्फ सनी दत्ता शिंदे (रा. वैदुवाडी) हा अनधिकृतरित्या घरगुती वापराच्या गॅस टाकीमधून गॅस रिफीलींग करून मशीनच्या सहाय्याने वाहनात भरत असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले.

बातम्या आणखी आहेत...