आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके पाण्याखाली:नगर, राहुरी, कर्जत तालुक्याला पावसाने झोडपले

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यातील नगर, राहुरी, कर्जत तालुक्याला बुधवारी रात्री पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे नगर तालुक्यात फळबागांसह अन्य पिके पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात २५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत १६.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जून महिन्यातील तीन दिवस वगळता उर्वरित महिना कोरडा गेला होता. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागली होती.नगर जिल्ह्यात गेल्या ५ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली होती. पंधरा दिवस पावसाचा जोर कायम होता. जिल्ह्याच्या सर्वच भागात या कालावधीत झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला होता.

संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात देखील वाढ झाली होती. बुधवारी रात्री नगर शहरासह जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर, राहुरी, कर्जत तालुक्यात ३० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नगर तालुक्यात ३५, राहुरी तालुक्यात ४२, कर्जत तालुक्यात ३३ मिलिमीटर पावसाची नोंद गेल्या २४ तासांत झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५२मिलिमीटर पाऊस झाला असून गेल्या २४ तासात १६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत झालेला पाऊस
नगर ३५, पारनेर २०, श्रीगोंदे १७, कर्जत ३३, जामखेड १२, शेवगाव ४.८, पाथर्डी १०, नेवासे १३, राहुरी ४२, संगमनेर २, अकोले १, कोपरगाव ५, श्रीरामपूर ९, राहता ३ मिलिमीटर पाऊस गेल्या २४ तासांत झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...