आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये 24 तासांत 22 मिलिमीटर पावसाची नोंद:भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम; जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

अहमदनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत अहमदनगर जिल्ह्यात 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, बुधवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे शेतीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अहमदनगर शहरात गुरुवारी सायंकाळीही पावसाने जोरदार हजेरी लावली.

नगर शहर व परिसरात गेल्या दोन दिवसापासून मध्यम व हलक्‍या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. भंडारदरा, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात ही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या 24 तासात अहमदनगर जिल्ह्यात 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील नगर 33, पारनेर 24, श्रीगोंदे 40 ,कर्जत 16, जामखेड 8 ,शेवगाव 27,पाथर्डी 24, नेवासे 30, राहुरी 28, संगमनेर 8, अकोले 7, कोपरगाव 11, श्रीरामपूर 20 व राहता 16 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तीन दिवसापूर्वी जिल्ह्यात 39 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.आता गुरुवार (23 जून )अखेरपर्यंत 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...