आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची दडी:अकरा तालुक्यांकडे पावसाची पाठ; पंधरा दिवसांत 40 मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस! ; 50 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस

नगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील अकरा तालुक्यात १५ दिवसांत ४० मिलिमीटर पेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे. केवळ पारनेर, जामखेड, पाथर्डी याच तीन तालुक्यात ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नगर जिल्ह्यात ३० टक्के कमी पावसाची नोंद जून महिन्याच्या १५ दिवसात झाली आहे. जिल्ह्याच्या ठराविक तालुक्यातच मान्सूनचा पाऊस झाला असून उर्वरित तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवल्याने चिंता वाढली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी १५ जून अखेरपर्यंत ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र १ ते १५ जून अखेर पर्यंत ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नगर शहरासह जिल्ह्यात १ जून पासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. यंदा मात्र पाऊस लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यातील नगर, श्रीगोंदे, कर्जत ,शेवगाव, नेवासे, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता या ११ तालुक्यात ४० मिलिमीटर पेक्षाही कमी पाऊस झाला आहे. केवळ पारनेर, जामखेड, पाथर्डी याच तीन तालुक्यात ५० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली आहे. गेल्या दोन दिवसापासून मात्र पावसाची कुठेही जिल्ह्यात नोंद झालेली नाही. जिल्ह्यात सर्वाधिक नगर तालुक्यातील जेऊर भागात १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

{नगर : 74 { पारनेर : 117 { श्रीगोंदे : 70 { कर्जत : 22 { जामखेड : 81 { शेवगाव : 64 { पाथर्डी : 95 { नेवासे : 64 { राहुरी : 71 { संगमनेर : 66 { अकोले : 55 { कोपरगाव : 42 { श्रीरामपूर : 39 { राहाता : 23

बातम्या आणखी आहेत...