आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मता:राजीव गांधी तंत्रज्ञान क्रांतीचे जनक

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न राजीव गांधी यांच्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांची कामगिरी जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली. देशाच्या विकासात गांधी यांचे मोठे योगदान राहिले. देशाच्या एकात्मता व अखंडेतेसाठी त्यांनी बलिदान दिले. तेच खरे विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केले.

यशोधन जनसंपर्क कार्यालय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी तांबे बोलत होत्या. डॉ. जयश्री थोरात, साई संस्थांचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर, जीवन पांचरीया, प्रा. बाबा खरात, सोमनाथ गोडसे, जावेद शेख, तात्या कुटे व पदाधिकारी उपस्थित होते.

तांबे म्हणाल्या, काँग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. राजीव गांधी यांनी संगणक व दूरसंचार क्रांतीचा पाया रचल्याने भारताचा जागतिक पातळीवर दबदबा निर्माण झाला. काँग्रेसने गोरगरिबांच्या विकासासाठी काम केले. लोकशाही व संविधान जपणाऱ्या या पक्षाच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. राजीव गांधी यांचे प्रेरणादायी विचारांचे युवकांनी अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. थोरात म्हणाल्या, राजीव गांधी यांनी लोकशाहीमध्ये युवकांना वयाच्या आठराव्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला. आज तरुणांचा ओढा आयटी क्षेत्राकडे आहे. या क्षेत्राचे जनक राजीव गांधी यांनी दूरदृष्टीने आधुनिक विचारातून संगणक क्रांती केली. विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या या भारत मातेच्या पुत्राने देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले.

बातम्या आणखी आहेत...