आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात अखिल भारतीय महिला लोककला संमेलन पार पडले. या समारंभात नगरच्या सुप्रसिध्द लावणीसम्राज्ञी, तथा सिनेअभिनेत्री राजश्री काळे-नगरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लावणी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, संगीत नाटक अकादमी व ‘डब्लू-२०’च्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, मुंबई विद्यापीठातील शाहीर अमर शेख अध्यासनचे प्रमुख डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे आदी या वेळी उपस्थित होते. लावणीसम्राज्ञी राजश्री नगरकर यांनी अकलूजच्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवात सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
तसेच ‘बरखा सातारकर'' या मराठी चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक लावणी महोत्सवाबरोबरच त्यांनी जपान, नेदरलँड, रशिया, इंडोनेशिया, न्युझीलंडमध्येही महाराष्ट्राची अस्सल पारंपरिक लावणी सादर केली आहे. तसेच, प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक लावण्यांचा जिवंत देखावा त्यांनी सादर केला होता. सुपे येथील कालिका लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्राच्या माध्यमातून त्या लावणी सादर करीत असतात. त्यात त्यांना भगिनी आरती काळे नगरकर व इतर महिला लावणी कलावंतांचे साहाय्या होते. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात सिनेनृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, सोनिया परचुरे, डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. गणेश चंदनशिवे आदी सहभागी झाले होते. मृण्मयी भजक यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.