आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साठणवुक:रक्तचंदन साठा प्रकरण, आरोपींचे जामीन फेटाळले ; गुन्ह्याच्या तपासासाठी सात दिवसांची कोठडी

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुमारे चार कोटी रूपयांच्या रक्तचंदन साठाप्रकरणी तीन आरोपींचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायालयाने नामंजूर केला. एमआयडीसीतील वखार महामंडळ परिसरातील सदाशिव झावरे यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकून रक्तचंदन जप्त केले होते. गोडाऊन मालक झावरे, विठ्ठल बबन झावरे (रा. वासुंदे ता. पारनेर), संतोष माने (रा. सावरगाव फाटा ता. पारनेर), सागर गोविंद मुळे (रा. जांबूत ता. शिरूर) यांना अटक केली होती. गुन्ह्याच्या तपासासाठी सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती. त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले होते. आरोपी विठ्ठल झावरे, माने व मुळे यांनी जामीन अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने त्यांचे अर्ज नामंजूर केले. अॅड. अनिकेत आव्हाड यांनी सरकारच्यावतीने काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...