आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाजवळ ध्येय, आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणतेही काम तो तडीस नेऊ शकतो हे राजेश परजणे यांनी आपल्या कृतीशील वृत्तीतून सिद्ध करून दाखवले असून गावाचा कायाकल्प कशाला म्हणतात, हे संवत्सर परिसरात आल्यानंतर लक्षात येते, असे उद्गार राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरी महाराज यांनी संवत्सर येथे काढले.
राजेश परजणे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून विविध विकासात्मक कामे मार्गी लावली. या योगदानाबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सरपंच सुलोचना ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात रमेशगिरी महाराज यांची राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल, तर योगीता पवार यांचा पंचायत समिती सदस्यपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला. प्रारंभी ग्रामदैवत शृंगेश्वर ऋषी, रामदासी महाराज, नामदेवराव परजणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपसरपंच विवेक परजणे यांनी स्वागत केले. रमेशगिरी महाराज म्हणाले, तळागाळातील जनतेला त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत, हा ध्यास स्वर्गीय नामदेवराव परजणे यांनी अंगी बाळगला. आज संवत्सर परिसरात जी विकासाची मंदिरे उभी आहेत, त्यासाठी परजणे अण्णा यांनी भक्कम पाया निर्माण करून ठेवला. आज याच मंदिरांवर राजेश परजणे यांनी कळस चढवला. राजेश परजणे म्हणाले, राजकारणात येण्यासाठी आण्णांचा मला विरोधच होता. परंतु आण्णांची वाटचाल खंडित होऊ नये म्हणून मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. पुढे महानंद, भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन, कॅनरा बँक अशा देश पातळीवरील संस्थांवर काम करण्याची संधी मला उपलब्ध झाली. याप्रसंगी लक्ष्मण साबळे, रणशूर सर, खंडू फेपाळे, निवृत्त पोलिस अधिकारी राजेंद्र लोखंडे, दिलीप ढेपले, चंद्रकांत लोखंडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.