आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष कौतुक:ढोरजळगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मातेची रांगोळी ठरली आकर्षण

शेवगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ढोरजळगाव येथे गौराईच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या रांगोळीचे विशेष आकर्षण ठरले. ढोरजळगाव येथील देशमुख कुटुंबातील तेजस्विनी देशमुख यांनी गौराईसमोर विठ्ठल रुक्मिणी मातेची अप्रतिम अशी रांगोळी काढली. या रांगोळीचे गावातील नागरिकांनी विशेष कौतुक केले.

तेजस्विनी यांना ही रांगोळी काढण्यासाठी सहा तास लागले. या रांगोळीत फुलांमध्ये तयार केलेला आकर्षक गणपती सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. याचबरोबर गौराईंना विविध प्रकारच्या फुलांनी सजवून विद्युत रोशनी करण्यात आली होती. गौराई या तीन दिवसाची माहेर वाशिन असल्यामुळे त्यांची ओटी भरण्याचे हे दृश्य मी बनवले. आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी माता यांची प्रतिकृती दिवसभर वेळ देऊन ही काढलेली रांगोळी काढून मला खूपच आनंद झाला, असे तेजस्विनी देशमुख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...