आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:घरकुलांमुळे मिळणार हक्काचा निवारा, महानंद राज्य सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचे प्रतिपादन

पिंपरणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं स्वतःचं घर असावं ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी माणूस जिवाचा आटापिटा करत असतो. २२ आदिवासी कुटुंबांना सरकारने घरकुले मंजूर केली व ग्रामपंचायतने गावठाणात जागा उपलब्ध करून दिल्यामुळे घरकुल धारकांना हक्काचे घर मिळाल्याने त्यांचा कायमचा निवाऱ्याचा प्रश्न मिटला, असे प्रतिपादन येथील ग्रामपंचायतचे घरकुल योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी महानंद राज्य सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले.

राजहंस दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, पिंपरणेच्या सरपंच शैला साळवे, उपसरपंच अजित देशमुख, भागवत ठोंबरे, राजेंद्र देशमुख, शिवराम वाकचौरे, अरुण देशमुख, संचालक रवींद्र रोहम, दादासाहेब देशमुख, दिनकर वाकचौरे, मंजाबापू साळवे, संजय बागुल, गंगाराम वाकचौरे, कुंडलिक ठोंबरे, दादाभाऊ गायकवाड, किसन साळवे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...