आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण प्रकरण:हनुमान गडाचे मठाधिपती खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा

जामखेड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यातील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला, खाडे महाराज यांना मारहाण प्रकरणी पाच जणांविरोधात खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हनुमानगड येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल गुन्हा जामखेड तालुक्यातील एका महिलेने गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, बुवासाहेब जिजाबा खाडे याने जून २०२२ ते १२ जुलै २०२२ या कालावधीत फिर्यादीला दागिने तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादीच्या संमतीशिवाय खाडे याने शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी खाडे विरोधात गुरुवारी रात्री ११.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मठाधिपती खाडे यांनी आपल्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरोधात खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . सोन्याची चेन, अंगठ्या, मणी असा १३ लाख ६० हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खाडे यांच्या फिर्यादीवरून बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते (सर्व रा. मोहरी, ता. जामखेड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रकरण मिटवण्यासाठी प्रतिष्ठितांचे प्रयत्न
घटना घडल्या नंतर हे प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी मिटवण्याचे प्रयत्न केले. खाडे महाराजांना मारहाण झाल्या नंतर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तेथे कुणालाही भेटू दिले जात नव्हते. त्या नंतर महाराजांना नगर येथे हलवण्यात आले आहे. जामखेड तालुक्यात खाडे महाराजांचा भक्तगण मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्यांचे तालुक्यात जास्त येणे जाणे होते.

बातम्या आणखी आहेत...