आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:चिमुरडीवर बलात्कार; नराधमास केले अटक, आरोपीने 5 वर्षांच्या मुलीवर केला होता अत्याचार

राहुरी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमास राहुरी पोलिसांनी गजाआड केले. राहुरी तालुक्यातील पूर्व भागात शनिवार १८ जूनला दुपारच्या वेळेत ही निंदनीय घटना घडली. किशोर ऊर्फ केश्या विजय पवार असे नराधम आरोपीचे नाव आहे.

संबंधित नराधमाने ५ वर्षीय बालिकेला तिच्या घरातून उचलून परिसरातील शेतात नेले. या चिमुरडीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून बेपत्ता झालेल्या आपल्या चिमुरड्या मुलीचा परिसरात शोध घेत असलेल्या आईने ही घटना पाहिल्याने नराधमाला जागेवर पकडून आरडाओरड केला. दरम्यान, पीडित बालिकेचे वडील घटनास्थळी येत असल्याचा सुगावा लागताच हा नराधम पीडित बालिकेच्या आईला धक्का देऊन घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर लहान चिमुरडीला उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, श्रीरामपूर तालुका पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलिस उपनिरीक्षक एस. बी. देवरे, राहुरीचे पोलिस उप निरीक्षक निरज बोकील, सज्जन नारेडा व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिस पथकाने रविवारी आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून नराधम किशोर ऊर्फ केश्या विजय पवार याच्या विरोधात अपहरण, बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जन नारेडा करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...